⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | नोकरी संधी | ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4455 भरती सुरु

ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4455 भरती सुरु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर बँक भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन म्हणजेच IBPS ने विविध सरकारी बँकांमध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. प्रोबेशनरी ऑफिसरच्या 4455 जागांसाठी ही भरती निघाली आहे.

विशेष या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रियाही आज, 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर्स/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
या बँकांमध्ये होणार भरती?
ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरली जातील. .

शैक्षणीक पात्रता :
PO पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही प्रवाहात पदवी असणे आवश्यक आहे.
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2024 पर्यंत 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. कमाल वयोमर्यादेत SC/ST साठी 5 वर्षे, OBC (नॉन-क्रिमी लेयर) साठी 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10 वर्षे सूट देण्यात आली आहे.

अर्जाची फी किती आहे?
अर्जाची फी सर्वसाधारण/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये आणि SC/ST/PWD उमेदवारांसाठी रुपये 175 निश्चित करण्यात आली आहे.
निवड कशी होईल?
पीओ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा इत्यादी प्रक्रियेद्वारे केली जाईल. 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी प्राथमिक परीक्षा होणार आहे. यामध्ये यशस्वी झालेले उमेदवार 1 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेला बसतील.

अर्ज कसा करावा?
ibps.in
या अधिकृत वेबसाइटवर जा.
होम पेजवर दिलेल्या PO Apply च्या लिंकवर क्लिक करा.
आता नोंदणी करा आणि अर्ज करा.
तपशील प्रविष्ट करा आणि दस्तऐवज अपलोड करा.
फी भरा आणि सबमिट करा.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.