घरगुती वाद विकोपाला ! पतीकडून पत्नीची हत्या, जामनेरमध्ये खळबळ

सप्टेंबर 19, 2025 12:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नसून अशातच जामनेर तालुक्यातून खुनाची एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात घरगुती वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. मुंदखेडा (ता जामनेर) या गावात ही घटना घडली असून या घटनेनं गावात खळबळ उडाली.

anil bil murder

अनिता ऊर्फ मीनाबाई भिल असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी अवघ्या काही तासातच मारेकरी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाळू भिल असे मारेकरी आरोपी पतीचे नाव आहे.

Advertisements

याबाबत असे की, जामनेर तालुक्यातील मुंदखेडा येथे वास्तव्यास असलेले बाळू आणि अनिता यांच्यात कोणत्या तरी कारणातून वाद निर्माण झाला. दोघांमधील हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात बाळू याने पत्नी अनिता हिच्यावर चाकूने सपासप वार केले. यानंतर बाळू हा घटनास्थळावरून फरार झाला होता. तर आजूबाजूच्या नागरिकांना घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी अनिता ऊर्फ मीनाबाईला जखमी अवस्थेत जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

Advertisements

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सदर घटनेचा पंचनामा केला. यानंतर अवघ्या काही तासातच घटनास्थळावरून फरार झालेल्या बाळू यास पोलिसांनी पकडून बेड्या ठोकल्या. या प्रकरणी मारेकरी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now