⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | नोकरी संधी | BA, B.Sc, B.Com पास उमेदवारांसाठी केंद्रीय नोकरीची संधी.. ‘या’ खात्यात बंपर भरती

BA, B.Sc, B.Com पास उमेदवारांसाठी केंद्रीय नोकरीची संधी.. ‘या’ खात्यात बंपर भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

HURL Bharti 2023 हिंदुस्तान उर्वरक इवम रसायन लिमिटेड (HURL) ने नॉन-एक्झिक्युटिव्ह श्रेणीच्या पदांवर भरती केली आहे. याभरती अंतर्गत 240 पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मे 2023 आहे.

बिगर कार्यकारी संवर्गातील या भरतीसाठी उमेदवारांनी रसायनशास्त्र विषयासह बीएससी केलेले असावे. ज्यामध्ये किमान ४० टक्के गुण असावेत.डिप्लोमा इन केमिकल इंजिनीअरिंग / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा BA / B.Sc / B.Com देखील अर्ज करू शकतात. यासोबतच अतिरिक्त पात्रताही आवश्यक आहे. ज्याची माहिती अधिसूचनेत उपलब्ध असेल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज https://hurl23.onlineregistrationform.org/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल.

अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रिक्त पदांचा तपशील
कनिष्ठ अभियंता सहाय्यक-08
अभियंता सहाय्यक (I)-43
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (II)-01
अभियंता सहाय्यक (I)-30
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (II)-01
अभियंता सहाय्यक (I) – 27
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (II)-02
अभियंता सहाय्यक (I)-15
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (II)-14
अभियंता सहाय्यक (I)-35
अभियंता सहाय्यक (I)-06
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (II)-01
अभियंता सहाय्यक (I)-18
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (II)-11
प्रयोगशाळा सहाय्यक (I)-15
गुणवत्ता सहाय्यक (I)-03
कनिष्ठ लेखा सहाय्यक (II)-01
स्टोअर असिस्टंट (I)-01

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता

अभियंता सहाय्यक/कनिष्ठ अभियंता सहाय्यक – रसायनशास्त्र या विषयांपैकी एक विषय म्हणून B.Sc केलेले असावे. B.Sc मध्ये किमान 40% गुण असणे आवश्यक आहे.
किंवा केमिकल इंजिनिअरिंग केलेले असावे.

कनिष्ठ लेखा सहाय्यक – पूर्णवेळ बी.कॉम. किमान 40% गुणांसह B.Com उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

स्टोअर असिस्टंट – स्टोअर असिस्टंटच्या पदासाठी, BA/B.Sc/B.Com केलेले असावे. यामध्येही किमान ४० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट : उमेदवाराचे वय 30 ते 35 वर्ष दरम्यान, असावे.

निवड आणि पगार
या पदांवरील निवड परीक्षेच्या अनेक टप्प्यांनंतर केली जाईल. प्रथम संगणकावर आधारित चाचणी म्हणजेच CBT असेल. यानंतर ट्रेड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट होईल. निवड झाल्यावर अनुभवानुसार वेतन मिळते. साधारणपणे, एका वर्षात 4 ते 4.5 लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. याशिवाय इतर भत्तेही मिळतील.

ऑनलाईन नोंदणीसाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.