---Advertisement---
जळगाव जिल्हा बोदवड

बोदवडला प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ; कारवाईची मागणी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । बोदवड येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर प्रत्यक्षात शहरात आचारसंहिता जारी झाली आहे. दुसरीकडे निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी मातब्बरांसह इच्छूकांनी चाचपणीला सुरूवात केल्यानंतर आता शहरातील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याची बाब समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. प्रारुप मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्यानंतर नगरपंचायतीकडे हरकतींचा पाऊस पडत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. प्रभाग 1 ते 17 मध्ये मोठ्या प्रमाणात नावांची अफरातफर झाल्याचा उघड आरोप आता नागरीक करताना दिसून येत आहेत. या संदर्भात युवा सेनेचे तालुका समन्वयक अमोल व्यवहारे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे दखल घेवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

bodvad jpg webp

बोगस नावांचा समावेश असल्याचा आरोप

---Advertisement---

प्रकाशीत झालेल्या याद्यांतील नागरीकांची नावे पाहता संबंधित नागरीक त्या प्रभागात वास्तव्यास नाहीत वा भाड्यानेही राहत नाही त्यामुळे प्रारुप मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात बोगस नावे तत्कालीन मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले व मुख्याधिकारी आकाश डोईफोडे यांच्या कालावधीत झाल्याचा आरोप होत आहे. प्रारुप याद्यांत मोठ्या प्रमाणात झालेल्या बोगसगिरीला दोन्ही मुख्याधिकार्‍यांना जवाबदार धरून पुनरीक्षणासाठी येणारा खर्च मुख्याधिकार्‍यांकडून शास्तीच्या स्वरुपात दंडाद्वारे वसुल करावा तसेच निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती देउन तद्नंतर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण प्रक्रीया राबवुन मतदार याद्यांत सुसुत्रीकरण आणून शुद्धिकरण करण्यात यावे, अशी मागणी युवासेनेचे तालूका समन्वयक अमोल व्यवहारे यांनी मेलद्वारे केलेली आहे. तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी व आमदार चंद्रकांत पाटील यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---