रेशनकार्डमध्ये घरातील नवीन सदस्याचे नाव कसे टाकायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२१ । आधार कार्ड, मतदान कार्ड याप्रमाणेच रेशन कार्ड हे देखील एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. रेशनकार्डला शिधापत्रिका असेही म्हटले जाते. रेशन असो किंवा कोणतीही शासकीय योजना, यांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे रेशनकार्ड असणे आवश्यक आहे. रेशनकार्डवर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे नोंदविलेली असतात. तुमच्या घरात एखादा नवीन सदस्य आला असेल, अन त्याचे शिधापत्रिकेत नोंदवायचे असेल तर ते कशा पद्धतीने नोंदविता येईल, याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत.
कुटुंबात एखादा सदस्य नवीन आला तर आधी त्याचे आधारकार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. महिला सदस्याच्या आधार कार्डमध्ये पतीचे नाव लिहावे लागेल तर मुलाचे नाव जोडण्यासाठी वडिलांचे नाव आवश्यक आहे. यासोबतच पत्ताही बदलावा लागेल. आधार कार्डमध्ये अपडेट केल्यानंतर, सुधारित आधार कार्डच्या प्रतीसह, अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांना रेशनकार्डमध्ये नाव जोडण्यासाठी अर्ज सादर करावा लागेल. तसेच घरात मूल जन्माला आले असेल तर प्रथम जन्मलेल्या मुलाचे आधार कार्ड बनवावे लागेल. यासाठी मुलाचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे. यानंतर आधार कार्डवर नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज करावा लागेल.
ऑनलाइनही करू शकतात अर्ज
प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला तुमचा अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल. तुम्ही घर बसल्या नवीन सदस्यांची नावे जोडण्यासाठीही अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुमच्या राज्यात सभासदांची नावे ऑनलाइन जोडण्याची सुविधा असेल तर तुम्ही हे काम घरी बसून करू शकता.