---Advertisement---
जळगाव जिल्हा

पाऊस लांबला: जळगाव जिल्ह्यातील कोणत्या धरणात किती जलसाठा? पहा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२३ । जून महिना संपला आता अवघे दहा दिवस राहिले मात्र अद्यापही मान्सूनने राज्यात हजेरी लागली नाहीय. यंदा वादळामुळे मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या कोलंबल्या. आता शेतकरी मान्सून पाऊस कधी बरसेल याची प्रतीक्षा करत आहे. दरम्यान, दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील अनेक धरणांमधील जलसाठा कमी झाला आहे. मात्र जिल्ह्यातला सर्वात मोठा प्रकल्प हतनूर धरणातील जलसाठा गत वर्षीपेक्षा सध्या जास्त आहे.

dam jpg webp webp

मागीलवर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प शंभरटक्के भरले होते. मात्र वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. त्यातच अद्यापही मान्सूनने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पाचा जलसाठा घटला असून यामुळे पाणीटंचाईचे सावट दिसून येत आहे.

---Advertisement---

हतनूर धरणातील जलसाठा?
सध्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हतनूर प्रकल्पात ३७.४१ जलसाठा शिल्लक आहे. आनंदाची बाब म्हणजेच गतवर्षीपेक्षा या वर्षी हतनूर धरणात १३.४९ टक्के जास्तीचा जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हतनूर धरणात २३.९२ टक्के जलसाठा शिल्कक होता.

जिल्ह्यातील इतर धरणातील जलसाठा असा?
प्रकल्प – सध्या गेल्या वर्षी
हतनूर-३७.४१ – २३.९२
गिरणा- २२.९९- ३५.३०
वाघूर- ५९,८४ – ६५.२०
मन्याड- ९.१४- ७.८९
सुकी- ५९.८८- ५६.२९
हिवरा- ६.०१ – ००
बहुळा- १८.३०- २०.१३
अंजनी- १५.७७- २१.०८
भोकरबारी- ००- १४.९९
गूळ- ६२.८३- ३३.०६
बोरी- ०० – ७.६४
तोंडापूर – २९.१४ – ३३.३५
मोर – ६३.०३ – ३३.३५
मंगरूळ – ४१.२२ – ३७.७६
अंभोरा – ५५.३५- ५७.८१

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---