दारू न दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार ; यावल तालुक्यातील खळबळजनक घटना

जुलै 11, 2025 10:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२५ । जळगावच्या यावल तालुक्यातील चिंचोली फाट्यावर असलेल्या हॉटेल मालकावर अज्ञाताकडून गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. दारू न दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार झाला असल्याचं कारण समोर आलं आहे. प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय ४०, पुनगाव ता. चोपडा) असे जखमी हॉटेल मालकाचे नाव असून त्यांच्या मानेला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव मधील खाजगी रुग्णालयात करण्यात आले दाखल तर प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलीय.

Untitled design 6 jpg webp

नेमकी घटना काय?

प्रमोद बाविस्कर हे रेल्वेत नोकरीला असून त्यांचे चिंचोली फाट्यावर नावाचे हॉटेल आहे. गुरुवारी रात्री ९:३० वाजता हॉटेल बंद करून ते त्यांचे मित्र रतन वानखेडे यांच्यासोबत कारमध्ये बसले होते. कार रिव्हर्स घेत असताना दुचाकीवरून दोन तरुण त्यांच्या जवळ आले. त्यापैकी एकाने प्रमोद यांच्याकडे बिअरची मागणी केली. प्रमोद यांनी हॉटेल बंद झाल्याचे सांगून किनगावात बिअर मिळेल असे सांगितले. एवढ्यात, एका तरुणाने प्रमोद यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.

Advertisements

या गोळीबारात बावीस्करांच्या मानेला गोळी लागल्याने ते जागीच कोसळले. घटनेनंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. बावीस्करांच्या मुलाने आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांना जळगाव मधील खाजगी रुग्णालयात करण्यात आले दाखल तर प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आलीय.

Advertisements

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे पथकासह घटनास्थळावर पोहचले आणि त्यांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली. हल्लेखोर अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा तपास घेत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now