⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘लेटेक्स ओपन सोर्स टुल’वर सेमीनारचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २७ एप्रिल २०२२। येथील गोदावरी फाऊडेशन संचलित, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यासाठी लेटेक्स सॉप्टवेअर वर सेमीनार पार पडला. लेटेक्स हे एक सॉप्टवेअर आहे.

यावेळी संगणक विभागातील प्रा.माधुरी झंवर यांनी लेटेक्सचे महत्व विशद केले. लेटेक्स मध्ये टेबल्स, फिगर्स, बुलदेस, नंबर्स, कॉलम कन्टेंट, फॉन्ट साईज, चापटर्स, टेबल ऑफ कन्टेंट, इंडेक्स या सर्व बाबीचे जनरेशन कसे करायचे याबद्दल सांगितले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद देत प्रकल्प लिखाण, रिपोर्ट लेखनासाठी लेटेक्स हा उपयुक्त पर्याय असल्याचे सांगितले.

कार्यक्रमासाठी प्रा.जयश्री पाटील यांनी समन्वयक म्हणुन काम पाहिले. प्रा.प्रमोद गोसावी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार यांचे मार्गदर्शन लाभले.