⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | राशिभविष्य | आषाढी एकादशीचा दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा जाईल? जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

आषाढी एकादशीचा दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा जाईल? जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मेष
देवशयनी एकादशीच्या दिवशी तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे परंतु त्याच वेळी खर्च देखील वाढेल. सकारात्मक विचार ठेवा, फायदा होईल. चातुर्मासाचा काळ लाभदायी आहे, संधीचा फायदा घ्या आणि भरपूर मेहनत करा. शुभ फळ मिळेल.

वृषभ
बिझनेसमध्ये सध्या जोखीम पत्करणं फायद्याचं ठरू शकेल. विरोधकांच्या हालचालींकडे लक्ष देऊ नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. बिझनेस एक्स्पांशनशी संबंधित नियोजन समोर येऊ शकेल. तुमच्या नोकरीत महत्त्वाच्या बाबींची जबाबदारी तुमच्यावर येईल.उपाय : भगवान श्री विष्णूची पूजा करा.

मिथुन
आज एखादं पवित्र कार्य पूर्ण होईल आणि ते तुम्हाला मानसिक शांतता देईल. काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. बिझनेसमधल्या प्रलंबित कामाला गती मिळेल. सध्याचं कामही अगदी सुरळीत चालेल. बँक कर्मचारी, वकील, सीए आदींसाठी सध्याचा काळ अगदी अनुकूल असेल. ऑफिसच्या जबाबदाऱ्या तुम्ही अगदी उत्तम रीतीने पार पाडाल.उपाय : शिवलिंगावर जलाभिषेक करा.

कर्क
कामाच्या ठिकाणी कोणतंही नवं काम सुरू करू नका. खूप कष्ट घेऊनही तुम्हाला योग्य लाभ न मिळाल्याने कष्ट वाया जातील. रिअल इस्टेट, कमिशन, कपडे इत्यादींशी निगडित व्यवसायांमध्ये चांगला नफा मिळवण्यास संधी आहे.उपाय : श्री हनुमानाला शेंदूर लावा.

सिंह
प्रोफेशनल रिलेशनशिपचा आदर करा. महत्त्वाचं काम वेळेवर करा. आर्थिक बाबींमध्ये स्पष्टता राखा. नोकरदार व्यक्ती चांगलं काम करतील. क्षमता वाढेल. कामाच्या ठिकाणी शिस्त राखा. कष्टांवर भर द्याल. बिझनेसमध्ये सकारात्मक रिझल्ट्स मिळण्याची शक्यता आहे.उपाय : श्री लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवा.

कन्या
रात नवे रिसोर्सेस वाढतील. आर्थिक बिझनेसविषयक बाबीत भावनिकता टाळा. घाई-गडबड करू नका. तुमच्या वर्तनावर सकारात्मक नियंत्रण मिळवा. नफा मिळेल. काम चांगलं असेल.उपाय :

तूळ
प्रॉपर्टी किंवा शेअर्स आदींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. बिझनेसशी संबंधित बाबींसाठीचं नियोजन करण्यास काळ अनुकूल आहे. साहित्य आणि कला यांच्याशी संबंधित बिझनेसमध्ये उत्तम यशप्राप्ती होईल. तुम्ही केलेल्या कष्टांमधून तुम्हाला पूर्ण लाभ होईल. ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे आणि त्यांचं सहकार्य घेतलं पाहिजे.उपाय : भगवान श्री गणेशाला मोदक अर्पण करा.

वृश्चिक
बिझनेस प्रॉडक्शनशी संबंधित प्रकरणं प्रलंबित ठेवणं टाळा. नव्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप मजबूत असेल. ऑफिसमध्ये टीम स्पिरिट असेल. काम वाढेल. स्थिर मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये वाढ होईल. बिझनेसमध्ये इंडस्ट्री उत्तम असेल.उपाय : गोठ्यासाठी आर्थिक मदत द्या.

धनू
लोखंडाशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तींनी सावध राहावं. नोकरीत अनपेक्षित परिणाम साध्य होतील. करंट अफेअर्सवर लक्ष वाढवा. ऑफिसमधल्या परिस्थितीनुसार निर्णय घ्याल. आर्थिक बाजू सर्वसाधारण असेल. घाईगडबड करू नका. बिझनेस नॉर्मल असेल. वैयक्तिक खर्चांवर नियंत्रण ठेवाल.उपाय : काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.

मकर
आर्थिक बाजू प्रभावी ठरेल. बिझनेसमध्ये उत्साह असेल. आर्थिक बाबींत अ‍ॅक्टिव्हिझम असेल. स्पर्धेत जिंकाल. ऑफिसमध्ये कामावर लक्ष केंद्रित कराल. भावना नियंत्रणात राहतील.उपाय : भगवान शिवशंकरांना धोत्रा अर्पण करा.

कुंभ
नोकरदार व्यक्तीच्या नफ्यात वाढ होईल. बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल. बिझनेसमनची कार्यक्षमता वाढेल. नव्या ऑर्डर्स मिळू कतील. कोणतंही काही उद्यावर ढकलू नका. सकारात्मक कामगिरी सुरू ठेवाल. बिझनेसची परिस्थिती चांगली राहील.उपाय : गणेश मंत्राचं पठण करा.

मीन
बिझनेसमध्ये यशाच्या पायऱ्या चढाल. सहकार्याची भावना वाढीला लागेल. बिझनेसविषयक प्रकरणांमध्ये नातेसंबंधांचा फायदा घ्याल. कामाची व्याप्ती अपेक्षेनुसार वाढेल. बिझनेसमध्ये अपेक्षित रिझल्ट्स मिळतील. परफॉर्मिंग आर्ट्ससाठी संधी मिळतील.उपाय : अनाथाश्रमात पंखे दान करा.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.