विविध संस्थांतर्फे राष्ट्रीय डॉक्टर दिवसानिमित्त अधिष्ठाता व डॉक्टरांचा सन्मान
राष्ट्रीय डॉक्टर दिवसानिमित्त येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी १ जुलै रोजी दिवसभरात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील संस्थांनी अधिष्ठाता आणि डॉक्टरांचा सत्कार केला.
परिचारिका संवर्गातर्फे मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड आणि अधिपरिचारिका, अधिष्ठाता कार्यालयातील अधिकारी यांचेसह इंजिनिअरिंग कृती समितीतर्फे रवींद्र माळी व सहकारी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगावतर्फे आदेश पाटील व सहकारी, संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशिय संस्थातर्फे अध्यक्ष गणेश पाटील व सहकारी यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच डॉ. अब्दुल कलाम पुस्तक भिशी संस्थातर्फे विजय लुल्हे यांनी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्यासह कोरोना नमुने संकलन टीममधील डॉ. अनुराधा वानखडे, डॉ. राखी यादव, डॉ. सतीश सुरळकर यांचा शाल, श्रीफळ व सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र पुस्तक देऊन सन्मान केला.
कारागृह प्रशासनाकडून सन्मान
येथील जिल्हा कारागृहातर्फे राष्ट्रीय डॉक्टर्स दिवसानिमित्त अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. संदीप पटेल, डॉ. स्वप्निल कळसकर, डॉ. आकाश चौधरी, डॉ. पीयूष टाक, डॉ. प्रदीप शेट्टी आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर, जितेंद्र माळी आदी कर्मचारी उपस्थित होते.