जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२१ । अवैध धंद्याविरोधात कारवाई न करण्यासाठी तसेच वॉरंटची अंमलबजावणी न करण्यासाठी अडीच हजारांची लाच मागणार्या पाळधी आऊटपोस्ट ठाण्याच्या पोलीस नाईकासह होमगार्डला जळगाव एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास लाच स्वीकारताच अटक केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली.
पोलीस नाईक किरण सपकाळे व होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे, (वय-25, होमगार्ड रा.सोनवद, ता.धरणगाव, जि.जळगाव.)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला. गेल्याच आठवड्यात वरणगाव येथे पीएसआयसह कर्मचारी लाच घेताना सापडल्यानंतर हा दुसरा प्रकार समोर आला आहे.
यांनी केली कारवाई
पो.नि. संजोग बच्छाव, पो.नि. निलेश लोधी, सफौ.दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, सफौ. सुरेश पाटील, पोहेकॉ. रविंद्र घुगे, पोना. मनोज जोशी, पोना. सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ. प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ, पोकॉ.महेश सोमवंशी यांनी ही कारवाई केली.