जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२२ । सोशल मिडियातील प्रसिद्ध सेलेब्रिटी आणि बिग बॉस फेम हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक उद्या दि.२१ रोजी जळगावात येत आहेत. माजी महापौर तथा विद्यमान सभागृह नेते ललित कोल्हे यांचा दि.२२ रोजी वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते जळगावात येत आहेत.
विकास पाठक हे नाव ऐकून तुमच्या डोळ्यासमोर कोणी आलं का? मग ‘हिंदुस्थानी भाऊ’ म्हटल्यावर नक्कीच तुमच्या नजरेसमोर एका तरुणाचा चेहरा आणि त्याच्यावरचे मीम्स धडाधड आले असतील. ‘पहले फुर्सत में निकल’ असं म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा पठ्ठ्या ‘बिग बॉस 13’ मध्ये वाईल्ड कार्ड घेऊन आला आणि सर्वांच्या पसंतीला उतरला होता.
आपल्या हटके स्टाईलने अनेकांना घायाळ करणाऱ्या हिंदुस्थानी भाऊचे सोशल मीडिया आणि प्रत्यक्षात लाखो फॉलोअर्स आहेत. जळगाव मनपाचे माजी महापौर, सभागृह नेते ललित कोल्हे यांची हिंदुस्थानी भाऊसोबत घट्ट मैत्री आहे. ललित कोल्हे यांचा दि.२२ रोजी वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘हिंदुस्थानी भाऊ’ उद्या दि.२१ रोजी विमानाने जळगावात येणार आहे. इतकंच नव्हे तर रात्री जळगावात मुक्कामी थांबून ते ललित कोल्हे यांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत वेळ देखील घालवणार आहे.
हेही वाचा :
- राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; आज ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस? जळगावात कशी राहणार स्थिती?
- खुशखबर! जळगावात एकाच दिवसात सोने 700 तर चांदी 2500 रुपयांनी घसरली
- विधानसभेसाठी भाजप जळगाव शहरात भाकरी फिरणार!
- वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्या विरोधात महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन