जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी, जळगाव येथे नुकतेच हृदयरोग असलेल्या रुग्णावर (MVP with Mild MR) अत्यंत जोखमीची गर्भपिशवी काढण्याची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ.प्रशांत भारंबे (लॅप्रोस्कोपिक सर्जन) यांनी पार पाडली. शस्त्रक्रियेसाठी डॉ.गौरव झोपे (कार्डिओलॉजिस्ट) यांनी फिटनेस दिला, तर डॉ.तुषार सोनवणे (एम.डी. मेडिसीन) व भूलतज्ज्ञ डॉ.हेमंत पाटील उपस्थित होते.
या दिवशी एकूण ७ शस्त्रक्रिया सुरक्षितपणे पार पडल्या. या सर्व शस्त्रक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ.किरण बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार राजुमामा भोळे यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

जिल्हा माहिला व बाल रग्णालय, मोहाडी, जळगाव येथे दुर्बिणीव्दारे होणा-या शस्त्रक्रिया जसे गर्भपिशवी काढणे, अपेडिक्स काढणे, हर्निया दुरुस्ती इत्यादी अशा शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत अशा अनेक शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या जात असल्याने सदर गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.किरण बळीराम सोनवणे यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे केले आहे.







