Hero ने ‘या’ बाईकची किंमत 7000 रुपयांनी वाढविली
जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२३ । Hero MotoCorp ने त्यांच्या चाहत्यांना एक झटका दिला आहे. हिरोने Karizma XMR च्या किमती 7000 रुपयांनी वाढवल्या आहेत. 1 ऑक्टोबर 2023 पासून हा दर लागू झाला असून यानंतर आता Karizma XMR ची नवीन किंमत 1,79,900 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) असेल.
Hero Moto Corp ने ही बाईक मागील एक दीड महिन्यापूर्वी 1,72,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली होती. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, ग्राहक जुन्या किमतीवरच बुक करू होते. मात्र आजपासून ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.
काय आहे वैशिष्ट्ये?
या बाईकच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ही मोटरसायकल पूर्णपणे डिजिटल रंगीत एलसीडी डिस्प्लेने सुसज्ज आहे, ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि आघाडीचे टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन तंत्रज्ञान समाविष्ट आहे, जे त्याच्या विभागातील पहिले आहे. हे आयकॉनिक यलो, मॅट रेड आणि फँटम ब्लॅक या तीन वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केले जाईल.
दरम्यान,या नवीन Karizma XMR मध्ये 210cc लिक्विड कूल्ड DOHC इंजिन आहे. हे इंजिन 7250 rpm वर जास्तीत जास्त 20.4 Nm टॉर्क आणि 9250 rpm वर 25.5 PS पॉवर जनरेट करते. कंपनीने बाईकमध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे. याशिवाय बाइकमध्ये स्लिप आणि असिस्ट क्लच देण्यात आला आहे.