जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । जळगाव शहरात आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान, गेल्या काही दिवसपासून उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यात मान्सूनसह दमदार पावसाने हजेरी लावली नाहीय. हवामान रोज बदलते आहे. जोरदार वारे वाहत आहेत. यामुळे तापमानाचा पारा कमी होतो आहे. दुसरीकडे दुपारी असह्य उकाडाही होत आहे. दरम्यान, आज दुपारी वाऱ्यासह अचानक पावसाने हजेरी लावली. जवळपास २० ते २५ मिनिट पावसाच्या सरी कोसळत होत्या. शहरातील विविध भागात पाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली आहे. दरम्यान, या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात जूनचे १५ दिवस उलटले तरी पेरण्यायोग्य पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशीच्या पेरण्या केल्या. मात्र कोरड वाहू शेतकऱ्यांनी वखरणीची कामे केली आहेत. चांगला पाऊस पडल्यानंतरच पेरण्याचे नियोजन शेतकऱ्यांचे आहे.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1095874800941859