⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | बातम्या | महाराष्ट्रात आजपासून पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा ; कुठे कोसळधार पाऊस?

महाराष्ट्रात आजपासून पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा ; कुठे कोसळधार पाऊस?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२४ । केरळमध्ये अडखळलेला मान्सून येत्या ४८ ते ७२ तासांत महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात आजपासून पुढील ३ दिवस तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळणार आहे.

या जिल्ह्यात पावसाचा अंदाज
सध्या अरबी समुद्रादतून राज्याकडे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हा पाऊस ५ जूनपर्यंत सुरू राहील असंही सांगण्यात आलं आहे. पुण्यासोबत, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात येत्या ५ जूनपर्यंत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील. तर दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

यंदा मुंबईत पावसाचं आगमन वेळेवर होणार असून पावसाचे प्रमाणदेखील समाधानकारक असणार आहे. येत्या ६ ते १३ जूनपर्यंत मान्सून पूर्णत: मुंबईत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

जळगावातही पावसाचा अंदाज
जळगावतही पावसाचा अंदाज वर्तविले आहे. जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पावसासोबत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.