जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२४ । काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला. जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. आज रविवारी देखील राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात पहाटपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.
भारतीय हवामान विभागाकडून शनिवार व रविवारी जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. काल शनिवारी देखील जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. यांनतर आज रविवारी जिल्ह्याला पावसाचा येलो देण्यात आला असून जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार ते अतीजोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामानविभागाकडून वर्तविण्यात आला आहे. आज पहाटपासून जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. गरिकांनी सतर्कता बाळगावी तसेच गरज असल्यास तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
देण्यात आला आहे.जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार ते अतीजोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामानविभागाकडून वर्तविण्यात आला आहे. जोरदार पावसासोबतच किमी वेगाने ४० ते ५० वारेदेखील वाहणार आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत जर बाहेर फिरायला जात असाल, तर योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
राज्यातील आजची पावसाची स्थिती?
आयएमडीने आज रविवारी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाण्यासह पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव तसेच परभणीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर वाशिम तसेच गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर आज अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यात रविवारी पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून येत्या 3-4 तासांत पावसाचा जोर आणखीच वाढणार आहे. त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केलंय.