---Advertisement---
हवामान

काळजी घ्या! महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना IMD कडून उष्णतेच्या लाटेचा इशारा, जळगावात..

उष्णतेच्या लाटेचा इशारा
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२५ । राज्यभरात थंडी नाहीशी झाली असून आता उन्ह तापू लागलं आहे. जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ३५ अंशपर्यंत गेल्याने दिवसभर उकाडा आणि उन्हाचा चटका जाणवत आहे. यातच हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.

उष्णतेच्या लाटेचा इशारा

वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, विशेषतः घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्याधिक उन्हामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे पाणी आणि सावलीचा योग्य वापर करावा.

---Advertisement---

मुंबई आणि इतर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उष्णतेत सोमवारी आणखी वाढ झाली. मुंबई आणि परिसरात उन्हाची तीव्रता वाढत असून, आज मंगळावर आणि बुधवारपर्यंत तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.

फेब्रुवारी महिन्यातच तापमानाने ३५ अंश सेल्सिअस पार केली असून, सोलापूर आणि नागपूर येथे पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. संभाजीनगरमध्येही उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अलिकडच्या काळात ऋतूंमध्ये मोठा बदल होताना दिसत आहे. सध्याच्या हवामान स्थितीनुसार यंदा उन्हाळ्याची सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, २६ फेब्रुवारीला पालघरमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

जळगावातही चटका वाढतोय..
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चटका वाढताना दिसत आहे. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत कमाल तापमानात सरासरी तीन ते चार अंशांनी तर किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाली आहे. सध्या वाऱ्यामुळे रात्री आणि पहाटच्या वेळेस काहीसा गारवा जाणवत आहे. मात्र दुपारच्या उन्हाचा तडाखा जाणवत आहे. सोमवारी जळगावचे तापमान ३५ अंशांवर पोचल्याने दिवसभर उकाडा व उन्हाचे चटके जाणवले. आगामी दोन तीन दिवसात तापमानाचा पारा ३७ अंशावर जाण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment