---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

खान्देशात उष्णतेची लाट ; असह्य करणाऱ्या उकाड्याने नागरिक हैराण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२५ । राज्यात सध्या सूर्य आग ओकत असून अनेक शहरातील तापमानात मोठी वाढ झाल्याने असह्य करणारा उकाडा जाणवत आहे. खान्देशातही गेल्या तीन दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. मंगळवारी नंदुरबारात हंगामातील सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्या खालोखाल जळगावात ४३.३ तर धुळ्यात ४२.५ अंश तापमानाची नोंद झाली.

tapman jpg webp webp

खान्देशात गेल्या तीन दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली आहे दरम्यान जळगावात आजसाठी हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मंगळवारी जळगाव शहरात या हंगामातील सर्वाधिक ४३.३ अंशाची नोंद करण्यात आली आहे. आगामी दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४४ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

---Advertisement---

मंगळवारी धुळे शहराच्या तापमानाचा पारा ४२.५ अंशापर्यंत पोहोचला होता. नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अनावश्यक बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन धुळे महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संपदा कुलकर्णी यांनी केले आहे. मंगळवारी नंदुरबारात यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमान नोंदवण्यात आल्याची माहिती कोळदा येथील जिल्हा कृषी हवामान केंद्राकडून देण्यात आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment