जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । सध्या जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारपासून उष्ण झळा आणि उकाड्याने जळगावकर हैराण झालाय. यातच हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यात यावर्षी मार्च अखेरीसच उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. येणाऱ्या रविवारी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी तापमान ४३ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने जिल्ह्याला अलर्ट जारी केला असून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सर्तक राहण्याचे सांगितले आहे. स्वतःची काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.

जळगाव जिल्हा तीव्र तापमानासाठी ओळखला जातो. यावर्षी जळगाव जिल्ह्यात मार्चच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ होताना दिसून आले. सोमवारी जळगावचे कमाल तापमान ३९.३ तर किमान तापमान १६.३ होते. सध्या सकाळीच १० वाजल्यापासून उन्हाचा चटका बसत आहे. दुपारच्या वेळेस सूर्य आग ओकत असल्याने रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसून येतेय. सायंकाळी पुन्हा तापमानाचा पारा कमी होत असल्याने काहीसा वातावरणात बदल होताना जाणवत आहे. मात्र मार्च अखेरीस तापमानाचा कहर पाहायला मिळणार आहे. जिल्ह्याचे तापमान मे महिन्यात सर्वाधिक कमाल पातळीवर जात असते. 47 ते 48 अंशापर्यंत तापमानात वाढ होते. एप्रील व मे मध्ये दोन महिने जळगाव जिल्हा तापमानाचा उच्चांक गाठतो. मात्र यावर्षी हवामान विभागाने मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच तापमानाचा उच्चांक जळगाव जिल्हा गाठणार असल्याचे संकेत दिले आहे.
यामुळे रविवार पर्यंत हे तापमान 43° पर्यंत जाणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना 11 ते 4 या वेळेस घराबाहेर पडू नये काम असेल तर बाहेर पडावे तसेच आरोग्याच्या संबंधित कोणतीही समस्या असेल संबंधित डॉक्टर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेणे. लहान मुलांनी यावेळेस घराबाहेर पडू नये त्यांची विशेष काळजी घेण्यात यावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
हीटवेव्ह म्हणजे काय ?
उष्णतेची लाट ही वातावरणीय तापमानाची स्थिती आहे ज्यामुळे शारीरिक ताण येतो, ज्यामुळे कधीकधी मृत्यू देखील होऊ शकतो.
जागतिक हवामान संघटनेनुसार (IMD) जेव्हा दररोजचे कमाल तापमान सलग पाच किंवा त्याहून अधिक दिवस सरासरी कमाल तापमानापेक्षा पाच अंश सेल्सिअसने जास्त असते तेव्हा उष्णतेची लाट घोषित केली जाते.
वेगवेगळे देश त्यांच्या स्थानिक परिस्थितीच्या तुलनेत उष्णतेच्या लाटेची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे करतात.
भारतात, उष्णतेच्या लाटेची परिस्थिती म्हणजे एखाद्या स्थानकाचे कमाल तापमान मैदानी प्रदेशासाठी किमान ४०°C पेक्षा जास्त, किनारी प्रदेशांसाठी ३७°C किंवा त्याहून अधिक आणि डोंगराळ प्रदेशांसाठी किमान ३०°C किंवा त्याहून अधिक (NDMA, २०१९) पर्यंत पोहोचणे.