⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | चोरीच्या दुचाकींवर कमावत होता महिन्याला इनकम, विक्रीच्या पैशातून हॉटेलमध्ये दारू आणि जेवणाची पार्टी..

चोरीच्या दुचाकींवर कमावत होता महिन्याला इनकम, विक्रीच्या पैशातून हॉटेलमध्ये दारू आणि जेवणाची पार्टी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून भर दिवसा दुचाकी चोरी होत होत्या. शहरातून दररोज किमान ३-४ दुचाकी चोरी होत असताना पोलिसांच्या हाती कुणीही लागत नव्हते. अखेर शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने एकाच्या मुसक्या आवळल्या आहे. धरणगाव तालुक्यातील आव्हानी येथील एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून जिल्हा न्यायालय परिसरातून अटक केली असून त्याच्याकडून २ बुलेटसह ११ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. He was earning monthly income on stolen bikes

जळगाव शहरात आणि जिल्ह्यात दररोज होत असलेल्या दुचाकी चोरी रोखण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले आहे. दररोज जिल्ह्यात किमान ४-५ दुचाकी चोरी होत असताना पोलिसांच्या हाती कधीतरी चोरटे लागतात आणि १५-२० दुचाकी काढून देतात. पोलिसांनी बऱ्याचदा दुचाकी चोरटे पकडले देखील पण कारागृहातून बाहेर येताच पुन्हा ते त्याच वळणावर गेले. शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या पवन प्रेमचंद पाटील (कुंवर) रा.आव्हाणी ता.धरणगाव याला सापळा रचून अटक केली आहे.

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हवालदार विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, रतन गीते, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी चोरट्याला पकडण्यासाठी शहरात गोलाणी मार्केट, गोविंदा रिक्षा स्टॉप, न्यायालय परिसरात सापळा रचला होता. गेल्या एक महिन्यापासून पोलीस चोरट्याच्या मागावर होते. पवन पाटील जिल्हा न्यायालय परिसरात आल्याचे समजताच पोलिसांनी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी चोरट्याला चांगलाच खाक्या दाखवला परंतु त्याने कबुली दिली नाही मात्र प्रेमाने दोन घास खाऊ घालताच तो भडाभडा बोलू लागला. जळगाव शहर आणि इतर ठिकाणी दुचाकी चोरीची त्याने कबुली दिली आहे. पथकाने चोरट्याकडून २ बुलेटसह ११ दुचाकी हस्तगत केल्या आहे. मंगळवारी संशयित पावन पाटील याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.