---Advertisement---
वाणिज्य

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी गुडन्यूज ! MCLR मध्ये कपात, कर्जाचा EMI कमी होणार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२५ । देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे एचडीएफसी बँकेने MCLR मध्ये कपात केली आहे. बँकेने MCLR ०.१० टक्क्यांनी कपात केली आहे. यामुळे आता तुमचा होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचा ईएमआय कमी होणार आहे.

hdfc bank 1 jpg webp

आरबीआयच्या बैठकीपूर्वीच एचडीएफसी बँकेने एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. नवीन MCLR दर आज, ७ एप्रिल २०२५ पासून लागू झाला आहे. एमसीएलआर रेट हे एका महिन्यासाठी एमसीएलआर (MCLR) ९.२० टक्के होते. त्यात ०.१० टक्क्यांनी कपात झाली आहे. म्हणजेच आता एमसीएलआर ९.१० टक्के असणार आहे.तीन महिन्याचा रेट ९.३० टक्के होता.तो कमी होऊन ९.२० टक्के झाला आहे. सहा महिने ते २ वर्षांचा रेट कमी होऊन ९.३० टक्के करण्यात आला आहे. हा रेट आधी ९.४० टक्के होता.

---Advertisement---

MCLR वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा परिणाम
जेव्हा एखादी बँक तिचा एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट) बदलते तेव्हा गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि कार कर्ज यासारख्या सर्व फ्लोटिंग रेट कर्जांच्या ईएमआयवर परिणाम होतो. जर MCLR वाढला तर कर्जाचे व्याजदर वाढतात आणि तुमचा EMI महाग होतो. त्याच वेळी, जर MCLR कमी झाला तर व्याजदर कमी होतात, ज्यामुळे तुमचा EMI कमी होतो. नवीन कर्ज घेणाऱ्यांनाही याचा फायदा होतो कारण त्यांना पूर्वीपेक्षा स्वस्त कर्ज मिळू शकते.

MCLRकसा ठरवला जातो?
एमसीएलआर निश्चित करण्यासाठी बँका अनेक घटक विचारात घेतात, जसे की ठेव दर, रेपो दर, ऑपरेशनल खर्च आणि रोख राखीव प्रमाणाचा खर्च (सीआरआर). जेव्हा आरबीआय रेपो रेटमध्ये बदल करते तेव्हा त्याचा थेट परिणाम एमसीएलआरवर होतो. जर रेपो दर कमी झाला तर बँका एमसीएलआर देखील कमी करू शकतात, ज्यामुळे कर्जे स्वस्त होऊ शकतात. त्याच वेळी, जर रेपो दर वाढला तर एमसीएलआर देखील वाढतो आणि कर्जाचा ईएमआय महाग होतो.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment