जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२५ । तुमचंही खातं एचडीएफसी(HDFC) बँकेत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेने MCLR दर कमी केले आहेत. हे नवीन व्याजदर कालपासून म्हणजेच ७ मार्चपासून लागू केले आहेत. यामुळे कर्जावरील ईएमआयदेखील कमी होणार आहे. एचडीएफसी बँकेच्या या निर्णयामुळे कर्जदारांना फायदा होणार आहे. हा बदल २ वर्षांसाठी असणार आहे. त्यामुळे जास्त कालावधीसाठी कर्ज घेतलेल्यांना फार फायदा होणार नाही.

एचडीएफसी बँकेने MCLR मध्ये ०.५० टक्क्यांनी कपात केली आहे. यामुळे कर्जावरील व्याजदर कमी होणार आहे. यामुळे गृहकर्ज, कार लोन आणि पर्सनल लोनचे ईएमआय कमी होणार आहे. हे नवीन व्याजदर कालपासून म्हणजेच ७ मार्चपासून लागू केले आहेत. हा MCLR रेट २ वर्षांसाठी कमी केला आहे.
एचडीएफसी बँकेने १ महिना, ओव्हरनाईट, ३, ६ महिने १ वर्षांच्या कालावधीसाठी MCLR रेट कायम ठेवला आहे. हा MCLR रेट ९.४५% वरून ९.४०% करण्यात आला आहे. त्यामुळे लोनचे ईएमआय कमी होणार आहेत. गेल्या ३ वर्षांच्या कालावधीच या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.
जेव्हा बँक MCLR कमी करते तेव्हा होम लोन, पर्सनल लोनच्या व्याजदरावर परिणाम होतो. त्यामुळे ईएमआयकमी भरावा लागेल. यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.MCLR च्या आधारावर कर्जावरील व्याजदर ठरवले जातात. याशिवाय बँकांच्या एफडीचे व्याजदर, रोख राखीव प्रमाण, ऑपरेशनल खर्च या घटकांवर MCLR ठरवला जातो. यामुळे कर्ज स्वस्त होते. याउलट MCLR वाढल्यावर कर्ज महाग होते. व्याजदर वाढते.