सलग ३ दिवसापासून हतनूरचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडे, तापीला पूर
सावदा (प्रतीनीधी) – हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बेटिंग सुरू असल्याने दि. 22 रोजी रात्री 10 वाजेपासून धरणाचे 41 दरवाजे पूर्णक्षमतेने उघडण्यात आले असून दी 25 पर्यंत हे दरवाजर पूर्णपणे उघडे असल्याने तापी नदी पात्रात 1 लाख 6 हजार 122 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. तरी हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन पाठबंधारे विभागाचे अभियंता एन पी महाजन यांने केले आहे.
हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडल्याने भुसावळ , मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नागरीकांनी पाणी पाहण्यासाठी सावदा जाणाऱ्या पूलावर गर्दी केली होती . तसेच धरणाचे दरवाजे उघडे असल्याने पाटबंधारे याच्या कार्यालया लागून असलेल्या गेटजवळ नागरीकांनी गर्दी केली होती . मात्र या ठिकाणी कोणतीही घटना घडू नये म्हणून येथे पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे तर दी 25 रोजी रविवार असल्याने येथे अनेक नागरिकांनी पुर पाहण्यासाठी गर्दी केली होती
दरम्यान धरणास पाणी आल्याने धरण भरूले असून यावर अवलंबून असलेल्या गावंचा पाणी प्रश्न मिटला आहे, तर पुढे असलेल्या अनेक प्रकल्पात देखील पानी साठा धरणातून पाणी सोडल्याने वाढनार आहे.
हतनुर धरणात पुरेसा पाणी साठा होऊन ते भरले असले तरी रावेर तालुक्यातील गारबर्डी, मंगरुळ सह इतर धरणे अद्याप भरलेल नाही तालुक्यासाठी ही धरणे देखील भरणे आवश्यक आहे मात्र अद्याप तालुक्यात हवा तसा पाऊस झालेला नसल्याने आता तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे, जेणे करून भूजलपाणी पातळीत देखील वाढ होईल व या केळी पटयाची पाण्याची चिंता दूर होईल,