⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | चिंता वाढली! हतनूर धरणात केवळ ‘एवढा’ जलसाठा शिल्लक..

चिंता वाढली! हतनूर धरणात केवळ ‘एवढा’ जलसाठा शिल्लक..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२४ । संपूर्ण जळगाव जिल्ह्यात यंदाच्या मे महिन्यात तापमान वाढीचा कहर दिसून आला. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने पंचेचाळीसचा टप्पा ओलांडल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले. अशातच दुसरीकडे जिल्ह्यातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे.

भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणात केवळ 31% जलसाठा शिल्लकआहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात कमी जलसाठा शिल्लक असल्याने अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात आता भीषण पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे.

जिल्ह्यासाठी जिवनदायी असलेल्या हतनूर धरणातून भुसावळ शहरासह रेल्वे स्थानक, वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्र, काही एमआयडीसीसह जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत हतनूर धरणात केवळ 31% जलसाठा शिल्लक आहे. एकीकडे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ देखील साचला असल्याने जलसाठ्यावर परिणाम होत आहे. यातच बाष्पीभवनही वाढल्याने जलसाठा हा 31 टक्क्यांवर आला आहे. यामुळे अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.