बुधवार, ऑक्टोबर 4, 2023

तापी नदीच्या काठावरील नागरिकांसाठी महत्वाची बातमी : जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज : 16 सप्टेंबर 2023 : हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे 41 पैकी 4 गेट पुर्ण व 32 गेट 1.50 मीटरने उघडण्यात आले आहे. सध्या धरणातून 179895 evdha क्यूसेस पाण्याचा विसर्ग होतं आहे. या पार्श्वभूमीवर तापी नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हे क्षेत्र आता पूर्व मध्यप्रदेश आणि लगतच्या भागावर आहे. मध्य प्रदेशमधून कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकणपर्यंत तयार झाला असून त्यामुळे राज्यात आज जळगाव सह दहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होतं असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. सध्या धरणातून 41 पैकी 4 गेट पुर्ण व 32 गेट 1.50 मीटर उघडलेले असून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत 179895 क्यूसेस इतका विसर्ग सुरू आहे. पुढील काही तासात 200000 ते 250000 क्यूसेसपर्यंत विसर्ग हतनुर धरणातून जाण्याची शक्यता आहे


त्यामुळे तापी नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे