जळगाव लाईव्ह न्यूज । हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज येत आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार भाजपला बहुमत मिळाले आहे. ताज्या आकडेवारीत भाजप ४८ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस ३६ जागांवर पिछाडीवर आहे. अंतिम निकालानंतरच परिस्थिती स्पष्ट होणार असली तरी सध्याच्या परिस्थितीच्या आधारे काँग्रेसच्या खराब कामगिरीच्या कारणांवर चर्चा सुरू झाली आहे
सुरुवातीच्या कलानुसार, हरियाणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत होतं, तर भाजप प्रचंड पिछाडीवर होतं. पण अचानका काही फेऱ्यानंतर काँग्रेस पिछाडीवर गेली आणि भाजपने निर्णायक आघाडी घेतली. अचानक झालेला हा उलटफेर काँग्रेससाठी धक्का मानला जाते आहे. तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीबाबतच्या एक्झिट पोलचे आकडे सपशेल चुकल्याच दिसत आहे.
कुस्तीच्या रिंगमधून राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या विनेश फोगाट यांनी बाजी मारली आहे. हरियाणात जुलानामधून त्या काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवत होत्या. विनेश फोगाट यांनी भाजपाच्या कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव केला.