⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | गुन्हे | माहेरून पैसे आणावे म्हणून विवाहितेचा छळ

माहेरून पैसे आणावे म्हणून विवाहितेचा छळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । माहेरहून सोन्याचे दागिने व पैसे आणावे म्हणून विवाहितेस शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना फैजपूर येथे नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासू व सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील न्हावी येथील माहेर असलेल्या सिमरन रहीम पिंजारी (वय-२६) यांचा विवाह मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रहीम मोहम्मद पिंजारी यांच्याशी रितीरिवाजानुसार सन २०२० मध्ये झाला होता. काही दिवसानंतर पती रहीम पिंजारी याने विवाहितेला माहेरून सोन्याचे दागिने व पैसे आणावे अशी मागणी करीत पैसे आणले नाहीतर तुला नांदविणार नाही असे सांगून दमदाटी केली. तसेच सासू आणि सासरे यांनी देखील पैश्यांसाठी सारखा तगादा लावला होता. या जाचाला कंटाळून अखेर विवाहिता माहेरी निघून आली. या प्रकरणी दि .२१ एप्रिल रोजी विवाहितेने फैजपूरपोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पती रहीम मोहम्मद पिंजारी, सासू तमीजा मोहम्मद पिंजारी आणि सासरे मोहम्मद पिंजारी सर्व रा. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र महाजन हे करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.