जळगाव लाईव्ह न्यूज । नवीन वर्ष २०२५ च्या आगमनाने सर्वांचे मन आनंदाने आणि उत्साहाने भरून गेले आहे. या नव्या वर्षात जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा देणे ही एक सुंदर परंपरा आहे जी नात्यांना अधिक घट्ट करण्यात मदत करते. या लेखात, आम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात आणि त्यांना मेहनत घेत यश मिळवण्यासाठी प्रेरित कसे करावे याबद्दल बोलणार आहोत. काही संदेश पुढील प्रमाणे आहेत.
एक नवीन सौंदर्य,
एक नवीन स्वप्न,
एक विश्वास, एक आस्था
एक चांगला विचार.
हीच आहे चांगल्या नवीन वर्षाची सुरुवात.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
२०२५ हे येणारे नवेवर्ष
तुमच्या जीवनात सुख
आणि समाधान घेऊन येवो.
हे नवीन वर्ष आपणास
भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
सरत्या वर्षाला निरोप देत,
नवी स्वप्न, नव्या आशा,
नव्या उमेदी आणि
नाविन्याची कास धरत
करू नवीन वर्षाचे स्वागत.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
नव्या वर्षाच्या सुरुवातीला
नवीन नाती जपूया,
नव्या धोरण्यांच्या चरणी
एकदा तरी आपले
मस्तक झुकवूया
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
गेलेल्या वर्षासोबत आपणही विसरू हेवेदावे,
नव्या वर्षाच्या उत्साहात जमुया आपण सारे,
नववर्षाभिनंदन!
हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे
कायम राहो,
खूप प्रेमळ होता
२०२४ चा प्रवास,
अशीच राहो आपली
नवीन वर्षी साथ.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवे क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा.
2024 मध्ये माझ्या सुख-दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे बरं…
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा बरं…
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या
एवढंचं म्हणणं मांडतो बरं
आपणास व आपल्या परिवाराला 2025 या येणाऱ्या नवीन वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा !