---Advertisement---
राजकारण मुक्ताईनगर

देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसांनिमित्त खडसेंनी अश्या’ दिल्या शुभेच्छा…

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । गेल्या दोन वर्षांपूर्वी एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून होत असलेल्या त्रासामुळे भाजप सोडली असल्याची खंत त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवली. या दोन नेत्यांमधील राजकीय वैर सगळेच जाणतात. असं असलं तरी राज्याचं राजकारण या सगळ्या पलिकडचं आहे. कितीही वैर असले तरी एकमेकांना खुल्या मनाने शुभेच्छा दिल्या जातात.

khadse fadanvis jpg webp

आजही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. “राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री देवेंद्र फणडवी जी, वाढदिवसानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन!”, असं ट्विट करत खडसेंनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

---Advertisement---

तसंच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांनाही खडसेंनी शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा, आज आपला जन्मदिवस. त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन!”, असं म्हणत खडसेंनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---