जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा काही दिवसात सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दहावी-बारावीचे विद्यार्थी आता अभ्यासाला लागले असून आता बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिले जाणार आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी सोमवारपासून हॉल तिकीट दिले जाणार आहे.बारावीची परीक्षा फेब्रुवारीत सुरु होणार आहे. त्यासाठी एक महिनाभर आधी म्हणजे १२ जानेवारीपासून हॉल तिकीट दिले जाणार आहे.

बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च रोजी होणार आहे. त्यासाठी एक महिनाभर आधी म्हणजे १२ जानेवारीपासून हॉल तिकीट दिले जाणार आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध होणार आहेत, याबाबत राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी माहिती दिली आहे.

अशा प्रकारे हॉल तिकीट डाउनलोड करा
बारावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यानंतर मंडळाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या हॉल तिकीटची प्रत काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहे. यासाठी कोणतेही वेगळे शुल्क लागणार नाहीये. प्रवेशपत्राच्या प्रतीवर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही असणे आवश्यक आहे, अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.




