---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

15 ते 20 अर्धनग्न तरुणांची दहशत; गाड्या अडवून केली दगडफेक, गाडेगावमधील धक्कादायक घटना..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२५ । जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गाडेगावजवळ असलेल्या सुप्रीम कंपनीजवळ 15 ते 20 अर्धनग्न तरुणांनी गाड्या अडवून त्यांच्यावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

gadegaon

महामार्गावरील गाडेगावात असलेल्या सुप्रीम कंपनीजवळ 15 ते 20 अर्धनग्न तरुण हातात तलवारी घेतल्या होत्या. या तरुणांनी महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्यावर त्यांनी दगडफेक केली. तर काही गाड्यांवर अंडी फेकली.

---Advertisement---

यात अनेक वाहनांचे काचा फुटल्या असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिक तसेच महिलांनी दिली. रस्त्यावरून याबाबत या महामार्गावरून जात असलेल्या काही नागरिकांनी पोलिसात तक्रार देत कारवाईची मागणी केलीय. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment