जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) नाशिक येथे नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. याभरतीसाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांकडे आयटीआय प्रमाणपत्र आहे ते शिकाऊ पदांसाठी अर्ज करू शकतात.
या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार HAL च्या अधिकृत वेबसाइट hal-india.co.in वर अर्ज करू शकतात. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लक्ष्यात असू द्या या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. या भरतीद्वारे एकूण 324 पदे भरली जाणार आहेत. तुम्हालाही HAL मध्ये काम करायचे असेल तर खाली दिलेल्या या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.
रिक्त पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
पदांचा तपशील :
2 वर्ष कालावधी ITI ट्रेड्स
1) फिटर – 138
2) टूल आणि डाय मेकर (जिग आणि फिक्स्चर) – 5
3) टूल अँड डाय मेकर (डाय अँड मोल्ड) – 5
4) टर्नर – 20
4) मशिनिस्ट – 17
5) मशिनिस्ट (ग्राइंडर) – 7
6) इलेक्ट्रिशियन – 27
7) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 8
8) ड्राफ्ट्समन (यांत्रिक) – 5
9) मेकॅनिक (मोटार वाहन) – 6
10) रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक- 6
11) चित्रकार (सामान्य) – 7
1 वर्ष कालावधी ITI ट्रेड
12) सुतार- 6
13) शीट मेटल वर्कर – 4
14) संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) – 50
15) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – 10
16) लघुलेखक (इंग्रजी) – 3
शैक्षणीक पात्रता : अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी NCVT/SCVT संस्थेद्वारे मान्यताप्राप्त संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण केलेले असावे.
मानधन इतके मिळेल?
या भरतीद्वारे, 2 वर्षांच्या ITI ट्रेडसाठी निवडलेल्या उमेदवारांना मासिक 8050 रुपये आणि 1 वर्ष कालावधीच्या ITI ट्रेडसाठी निवडलेल्या उमेदवारांना 7700 रुपये मासिक स्टायपेंड मिळेल.
परीक्षा फी : फी नाही
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा