पाचोऱ्यात साडेबावीस लाखाचा गुटखा जप्त ; दोघांना अटक

एप्रिल 2, 2025 4:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात बंदी असलेला २२ लाख ५४ हजार रुपये किमतीचा पानमसाला व गुटखा पाचोरा शहरातील जळगाव चौफुलीवर पाचोरा पोलिसांनी पकडला. याप्रकरणी गुटखा मालक सनी टेकचंद पंजाबी व गाडी चालक दत्तू लालदास बैरागी या दोघांना अटक करून पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

crime 2 jpg webp webp

जळगाव चौफुलीवरील वरखेडी नाक्याजवळ नाकाबंदी करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे, हेकॉ. राहुल शिंपी, पोकॉ. सुनील पाटील, होमगार्ड संजय पाटील यांचे पथक पहाटे गेले होते. त्यावेळी जामनेरकडून पाचोराकडे येत असलेले एक वाहन पोलिसांना चकवा देत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी हेकॉ. राहुल शिंपी यांनी पाठलाग करीत हे वाहन अडविले.

Advertisements

वाहनाची तपासणी केली असता त्यात गोण्यांमध्ये गुटखा व पान मसाल्याचे पुडे आढळून आले. पंचांसमक्ष हे वाहन जप्त केले. गुटख्याच्या ४७ व सुगंधी तंबाखूच्या ३१ गोण्या अशा २२ लाख ५४ हजार किमतीच्या एकूण ७८ गोण्या तर आठ लाख किमतीचे वाहन पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी मालक सनी टेकचंद पंजाबी वाहन चालक दत्तू लालदास बैरागी यांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment