गुन्हेजळगाव जिल्हा

Jalgaon : हळदीच्या कार्यक्रमात बंदूक घेऊन दहशत माजवणाऱ्याला तरुणाला नागरिकांनी चोपले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरात राजाराम हॉलमध्ये आयोजित हळदीच्या कार्यक्रमात एक अनपेक्षित घटना घडली. या कार्यक्रमात एक तरुण बंदूक घेऊन दहशत माजवू लागला, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली. दरम्यान दहशत माजवणाऱ्याला तरुणाला नागरिकांनी एकत्रितपणे पकडून चांगलाच चोप दिला.

शहर पोलीस ठाण्याचे पथक दि. २२ डिसेंबर रोजी रात्री गस्तीवर असताना इंद्रप्रस्थ नगरात राजाराम नगर मंगल कार्यालय बाहेर वाद सुरु असल्याची माहिती मिळाली. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी उमेश भांडारकर आणि वसीम मलिक त्याठिकाणी पोहचले असताना, त्यांना गर्दीत मारहाण होत असलेल्या तरुणाला सोडवावे लागले. पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता त्याने सांगितले की त्याचे नाव अतुल बजरंग तांबे (वय ३१ वर्ष, राजगुरू नगर, जि. पुणे) असे असल्याचं सांगितले.

नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली की अतुल तांबे याच्यासोबत आणखी दोन जण होते. पोलिसांनी घटनेची माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना कळविली. शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रामचंद्र शिखरे, सहायक उपनिरीक्षक सुनील पाटील, हवालदार किशोर निकुंभ, प्रफुल्ल धांडे, भास्कर ठाकरे यांनी धाव घेतली.

पोलिसांनी अतुल तांबे याच्याकडे असलेल्या बॅगेतून गावठी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. त्याने सांगितले की पळून गेलेल्या एकाचे नाव माया तर दुसऱ्याचे नाव त्याला माहीत नाही. शहर पोलीस ठाण्यात हवालदार उमेश भांडारकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अतुल तांबे, माया आणि आणखी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button