.. मग आम्ही काँग्रेससोबत युती करण्यास तयार ; मंत्री गुलाबरावांच्या व्यक्तव्याने खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२३ । शिवसेनेचे (Shiv Sena) (शिंदे गट) मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एका मोठं व्यक्तव्य केल्याने सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ती म्हणजे काँग्रेससोबत (Congress) युती करण्याचं विधान गुलाबराव पाटलांनी केलं आहे.

आम्ही काँग्रेस सोबत युती करायला तयार आहोत, असं मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. मात्र, त्याचबरोबर गुलाबराव पाटील यांनी एक अटही घातली आहे. आता ही अट काँग्रेस मान्य करणार काय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी हे पूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. त्या काँग्रेसवाल्यांनी आमचे पठ्ठे फोडले. त्यांच्याबरोबर आम्ही बिलकुल जाणार नाही. पण राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हातात भगवा घ्यावा. मग आम्ही काँग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत. असे वक्तव्य शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना उभी केली ती भगव्या करता केलेली आहे. हिंदुत्वाकरता केलेली आहे. राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकतो हे कधीच होणार नाही, मात्र काँग्रेससोबत युती करण्यास आम्ही तयार असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली आहे.

पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, यापूर्वीच आम्ही उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी होण्याआधी सावध केले होते की पुढे रेड झोन आहे. गाडी फेल होईल. जाऊ नका. आपण आता इथेच गाडी थांबवली पाहिजे. रस्ता चुकीचा दिसतोय. मात्र गाडीतले संजय राऊतसारखे काही चुकीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर भेटले. त्यामुळे गाडीचा अपघात झाला. गाडी दिशाहीन झाली, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला लगावला.