पालकमंत्र्यांच्या हस्ते काटा पूजन – 834 क्विंटल ज्वारी, 277 क्विंटल तुरीस हमीभाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२५ । शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या सोयी – सुविधांसाठी सरकार कटिबद्ध आहे. कुठल्याही शेतकऱ्याला अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी,” असे स्पष्ट निर्देश देवून शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया उद्योग आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवला पाहिजे. मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव येथील मार्केट यार्डमध्ये शेतकी संघाच्या वतीने कडधान्य/ तूर व आण्णा सो. मु. ग. पवार सह. फळ व भाजीपाला खरेदी विक्री सोसायटी मर्यादित चांदसर यांच्या वतीने ज्वारीचे काटा पूजन करण्यात आले.
शेतकऱ्यांना दिलासा – ज्वारी आणि तुरीला हमीभाव”
मार्केट यार्डमध्ये 24 शेतकऱ्यांनी 834 क्विंटल ज्वारी विक्रीसाठी, तर 277 क्विंटल तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे .ज्वारीला प्रति क्विंटल ₹3,371 आणि तुरीला प्रति क्विंटल ₹7,550 असा दर निश्चित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेतकी संघाचे संचालक गोपाल पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक सचिव अरुण पाटील यांनी प्रास्ताविकात यांनी करत ज्वारी व तूर खरेदीबाबत साविस्तर माहिती विशद केली. तर चांदसर मू.ग.पवार फळ व भाजीपाला खरेदी विक्री सोसायटी चे सेक्रेटरी अनिल पाटील यांनी आभार मानले.
यांची होती उपस्थिती?
यावेळी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, जिल्हा बँकेचे चेअरमन, पणन महासंघाचे संचालक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शेतकी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, संचालक गजानन धनसिंग पाटील, शरद पाटील, संजय माळी, पवन सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, माजी सभापती प्रेमराज पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, ॲड. संजय महाजन, कन्हैया रायपूरकर, कृ. ऊ.बा. समितीचे माजी सभापती गजानन नाना पाटील, संचालक ज्ञानेश्वर महाजन, माजी गटनेते पप्पू भावे, विलास महाजन, वाल्मीक पाटील, चंदन पाटील, शामकांत पाटील, प्रेमराज पाटील, शिवदास पाटील, गोडाऊन मॅनेजर डि. बी. राजपूत, गणेश पवार, कर्मचारी भगवान महाजन, सागर पाटील, जगदीश पाटील, गुलाब चौधरी, नरेंद्र नेहेते, सोपान बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते.