---Advertisement---
राजकारण

पंकजा मुंडेंबाबत गुलाबराव पाटलांनी केला ‘हा’ गौप्यस्फोट; म्हणाले….

---Advertisement---

​​जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा असून पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत असतानाचा आता त्यात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देणारा पहिला मीच होतो, असं विधान गुलाबराव पाटील यांनी करून चर्चेचं माहोळ उठवून दिलं आहे.

gulabrao patil pankaja munde jpg webp

भाजप नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागत आहे, पंकजा मुंडे यांना ​शिवसेनेत स्थान व सन्मान मिळेल, अशी हमी देखील गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील कीनोद गावात मंत्री गुलाबराव पाटील हे आज शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी पंकजा मुंडे यांच्यसंदर्भात त्यांनी आपले मत व्यक्त केले.

---Advertisement---

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी त्यांच्या मागणी करत सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी आपले मत मांडले.

पंकजा मुंडे यांचा भाजपमध्ये छळ होत असल्याने त्यांनी शिवसेनेत यावं म्हणून सर्वात पहिली मी त्यांना ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट करतानाच पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्‍यांचे स्‍वागतच राहील. प्रवेश केल्‍यानंतर त्‍यांना पद काय द्यायचे हे मुख्‍यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील, असंही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण

यावर बोलताना गुलाबराव पाटील म्‍हणाले की, विधानसभा निवडणूकीनंतर पंकजा मुंडे यांना हवे तसे प्रतिनिधीत्‍व मिळाले नाही. मुळात गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी पडत्या काळात खूप मोठे काम केले आहे. आता मात्र त्‍यांच्‍या कन्‍या पंकजा मुंडे यांना संघर्ष करावा लागत आहे. भाजपने एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे यांना तिकिटेही दिली नाहीत. याचाच अर्थ ओबीसी समाजाचे कुठेतरी खच्‍चीकरण केले जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---