जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२५ । काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर एअर स्ट्राईक केला. यात शेकडो दहशतवादी ठार झालेय. ऑपेरेशन सिंदूर राबविल्यानंतर देशभरात आनंदाचे वातावरण भारतीय सैन्य दलाचे कौतुक केले आहे. तर काहींनी यावर प्रतिक्रिया दिली. त्यात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील विधान केलं. दहशतवादी तळावर हल्ले करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव टाकून कारवाई केली असती तर अधिक फायदा झाला असता, असं नाना पटोले म्हणाले. त्यांच्या या विधानावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांच्या घरचे गेले त्यांना विचारा कशावर हल्ला करावा; अशा शब्दातमंत्री मंत्री पाटीलांनी निशाणा साधला .

मंत्री गुलाबराव पाटील हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. तुळजाभवानी देवीची महाआरती केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोलेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री पाटील म्हणाले, कि नाना पटोले सारख्या माणसाने हे बोलणं योग्य नाही. पटोलेंच्या तोंडून हे शब्द शोभत नाहीत. पक्ष हा विषय वेगळा आणि देश वेगळा आहे. ज्यांच्या घरचे गेले त्यांना विचारलं पाहिजे कशावर हल्ला करावा; अशी प्रतिक्रिया दिली.
आई तुळजाभवानीने आमच्या सरकारला दहशतवाद्यांशी लढण्याचं बळ द्यावं. तसेच जे आमच्या देशाकडे काळ्या नजरेने बघतात त्यांचं तोंड कायमचं काळ करावं असे साकडं आई तुळजाभवानीला घातले असल्याचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळावं; अशी प्रार्थना देखील आई तुळजाभवानीला केली.
संजय राऊतांवर साधला निशाणा
मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. यात मंत्री पाटील म्हणाले, कि संजय राऊत म्हणजे बिना आवाजाचा बाज्या, त्याच्याकडं लक्ष देण्याची गरज नाही. तसेच संजय राऊत याना दुसर काही माहित नाही, दुसर काही तरी बोलल्याशिवाय मार्केट मिळणार नाही; असेही पाटील म्हणाले.