---Advertisement---
बातम्या

2000 च्या नोटबंदीवर गुलाबराव पाटलांचं गमतीशीर उत्तर, काय म्हणाले वाचा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२३ । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी एक धक्कादायक निर्णय घेत अचानक 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली. 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत लोकांनी त्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपयांच्या नोटा जमा कराव्यात किंवा बँकांमध्ये बदलून घ्याव्यात असं सांगितलं आहे. आता या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येताना दिसताय. अशातच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गमतीशीर उत्तर दिल आहे.

gulabrao patil jpg webp webp

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

---Advertisement---

2000 च्या नोटबंदीवर गुलाबराव पाटील यांना विचारताच ते म्हणाले, माझ्याकडे दोन हजार रुपयांची नोट नाही त्यामुळे मला माहित नाहीये, असं गमतीशीर उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलंय. त्यांच्या गंमतीशीर उत्तरानंतर या ठिकाणी एकच हशा पिकला. त्यांच्या उत्तराने यावेळी काही जण अवाक् झाल्याचे पाहायला मिळाले

नोट बदलण्याची शेवटची तारीख
२००० रुपयांची नोट बदलण्यासाठी शेवटची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर पर्यंत तुमची २००० ची नोट पाकीटात राहू शकते. या तारखेपर्यंतच तुम्ही ही नोट बदलून घेऊ शकता. बँकेत नोट बदलून तु्म्हाला त्याच्या जागी वैध चलन दिले जाईल. शेवटची तारीख आणखीन वाढवली जाणार की नाही याची माहिती मिळालेली नसून सध्या तरी २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे.

नोटा बदलण्यासाठी वेगळ्या खिडकीची सोय
बँकेत इतर दिवशी देखील मोठी गर्दी असते. अशात आता २००० रुपयांच्या नोटा बंद केल्यावर ही गर्दी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. २०१६ मध्ये नोटबंदी झाली होती तेव्हा बँकेत नोटा बदलण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अशात आता नागरिकांची गैरसोय होऊनये यासाठी प्रत्येक बँकेत नोटा बदलण्यासाठी स्वतंत्र विंडो असणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---