---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या महाराष्ट्र राजकारण

शपथविधीच्या काही तास आधीच गुलाबराव पाटील यांचं मोठं विधान; वाचा काय म्हणाले..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२४ । मुंबईच्या आझाद मैदानात आज महायुती सरकारचा शपथविधी होणार असून या शपथविधी सोहळ्याला आता अवघे काही तासातच शिल्लक आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे. मात्र यातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे.

gulabrao patil jpg webp

या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचे नाव गायब असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मोठं विधान केले आहे.

---Advertisement---

‘काळजीवाहू मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सर्वांनी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली की ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर गृहखातं शिंदेसाहेबांना मिळावं अशी आजही आमची मागणी आहे.’, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची शपथविधी समारंभाची गुलाबी पत्रिका व्हायरल झाली आहे. शपथविधी पत्रिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. या शपथविधी पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचे नाव दिसत नसल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ही शपथविधीची पत्रिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.तर दुसरीकडे शिवसेनेकडून काढण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर देखील एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाहीये. या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचे नाव गायब झाल्यामुळे ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---