---Advertisement---
जळगाव जिल्हा

ना.गुलाबराव पाटील यांनी स्विकारले अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व

---Advertisement---

गरजु व अनाथ मुलांना दीड लाख वह्यांसह शालेय साहित्य वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२४ । भाऊसो.गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन, जीपीएस मित्रपरिवार व विकी बाबा युवा मंचतर्फे आज धरणगाव तालुक्यातील गरजु व अनाथ मुलांना दीड लाख वह्यांसह शालेय साहित्य मोफत वाटप करण्यात आले. गरीब विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी व आपणही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला असून अनाथ विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक बाबींसाठी पालकत्व स्वीकारली असल्याची घोषणा ना. गुलाबराव पाटील यांनी केली.

Gulabraopatil news jpg webp

पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यात सुमारे ११०० अनाथ व गरीब गरजू मुलांना स्कूल बॅग, वह्या, कंपास पेटी, पाण्याची बॉटल व विविध स्वरूपाचे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सतत संघर्ष करून लढत रहा यश निश्चित मिळेल. अनाथ व गरीब गरजू मुलांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून पुढील शिक्षणासाठी अनाथ मुलांच्या मागे “आधारवड” म्हणून खंबीरपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

---Advertisement---

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट करत. गरजू व होतकरु विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथडा येवू नये म्हणून आज शालेय साहित्य वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मुकुंदराव नन्नवरे, संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन माजी प्राचार्य प्रा. सचिन पाटील यांनी केले तर आभार विकी बाबा युवा मंचचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, प्रेमराज पाटील, जनाआप्पा कोळी, राष्ट्रवादीचे नाटेश्वर पाटील, नगरसेवक मनोज चौधरी, विजय महाजन, वासुदेव चौधरी, धीरेंद्र पुर्भे, तालुका संघटक रवींद्र चव्हाण सर, डॉ. कमलाकर पाटील, सचिन पवार, पी.के.पाटील, जितू पाटील,उपतालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, मोहन पाटील, बालाशेठ लाठी, वासुदेव सोनवणे, पिक संरक्षणचे चेअरमन दगडू चौधरी, राजेंद्र पाटील, उगलाल पाटील, शाळेचे चेरमन विक्रम पाटील युवा सेनेचे भैया मराठे, अमोल पाटील, यांच्यासह जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी व सरपंच, जीपिएस मित्र परिवार, विकी बाबा युवा मंच, शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---