---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

आता पेशंट आपोआप आमच्याकडे येताय ; नेमकं काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२५ । जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विविध उपचारांसाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री घेतली असून, आज अद्ययावत एमआरआय मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना महाराष्ट्रात कोणाचे ऑपरेशन करणार असाल प्रश्न विचारण्यात आला.

GP

त्यावर बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “आता कोणाचं ऑपरेशन करण्याची गरज उरलेली नाही. पेशंट आपोआप आमच्याकडे येत आहेत.” गिरीश महाजन यांनी या खात्याचे मंत्री असताना संपूर्ण यंत्रणेची माहिती घेतली होती, त्यामुळे आज रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, असे त्यांनी सांगितले.

---Advertisement---

विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटलं, “माझ्याविरुद्ध किंवा युतीच्या उमेदवारांविरुद्ध जे लोक लढले आहेत, त्यांना घेणे योग्य नाही. काहीजण पक्ष वाढवण्यासाठी येत नाहीत, तर आपल्याकडील नको असलेले दुसऱ्यावर ढकलण्यासाठी येतात. हे अजित पवारांना लवकरच कळेल की फायदा झाला की नुकसान.” यावेळी गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर टोला लगावला.

संजय राऊत हे शास्त्रज्ञ नाहीत की भविष्यवक्ता. त्यांचं बोलणं अर्थहीन आहे. ते पुन्हा खासदार होतील की नाही, हे त्यांनाच पहावं लागेल पंतप्रधानांवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना पालकमंत्री म्हणाले, “पंतप्रधान अर्धा दोरा सोडून आले, तरी कोणी काही बोलत नाही. पंतप्रधानांवर टीका करणं म्हणजे सूर्यावर उपरोधितपणे बोलण्यासारखं आहे.”

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment