---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

ब्रेकिंग ! जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी गुलाबराव देवकर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२१ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची वर्णी लागली आहे. तसेच उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांची निवड झाली आहे.

Gulabrao Deokar as the Chairman of Jalgaon District Bank

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महा विकास आघाडीने दणदणीत विजय संपादित केला होता. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा समान वाटावा हवा असल्याने गेल्या काही दिवसांपासून बैठका सुरू होत्या. गुरुवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थित पदाचा फॉर्मुला निश्चित करण्यात आला होता. २० महिन्यांचा फॉर्म्युला खंडित करीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अध्यक्षपद ठेवले तर उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले.

---Advertisement---

बैठकीत पदाचा कार्यकाळ आणि पक्ष निश्चित झाले असले तरी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार याचा सस्पेन्स मात्र कायम होता. शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर यांनी अध्यक्षपदासाठी तर शिवसेनेकडून शामकांत सोनवणे यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. दोघांची निवड निश्चित झाली असून केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---