---Advertisement---
विशेष जळगाव जिल्हा

अंधारेंच्या सभेत गुलाबरावांनी मारली बाजी!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे नेहमीच कोणत्या न कोणत्या वक्तव्यमुळे चर्चेत असतात. सध्या त्या जळगावच्या दौऱ्यावर असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला. गेल्या काही दिवसापासून गुलाबराव विरुद्ध अंधारे या शाब्दिक जुगलबंदीचा त्यांनी मंत्री महोदयांच्या होम पीचवर जोरदार समाचार घेतला. विशेष म्हणजे सुषमा अंधारेंच्या सभेत व्यासपीठावर दिसून आलेली माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरांची उपस्थिती अनेकांना बुचकळ्यात टाकून गेली. गुलाबराव देवकर हे गुलाबराव पाटलांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असून सभेत व्यासपीठावर उपस्थिती देत देवकरांनी योग्य संधी साधली.

davkar and andhare jpg webp webp

जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादीत असले तरी त्यांचा मूळ मतदारसंघ जळगाव ग्रामीण आहे. जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर असा सामना जळगावकरांनी पाहिला आहे. दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून सर्वांना परिचित आहे. एकदा गुलाबराव पाटलांनी गुलाबराव देवकरांचा तर एकदा गुलाबराव देवकरांनी गुलाबराव पाटलांचा पराभव केला आहे. गेल्या अडीच वर्षात गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर सत्तेच्या एकाच नावेत स्वार असले तरी देवकरांकडून जळगाव ग्रामीण मतदार संघात जनसंपर्क कायम होता.

---Advertisement---

शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हटले जाणारे गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केला आणि तिथेच गुलाबराव देवकरांना मोकळं रान मिळाले. अगोदरच जळगाव ग्रामीण मतदार संघात गुलाबराव पाटील हे सध्या विद्यमान मंत्री असून त्यांची पकड देखील जोरदार आहे परंतु ते शिंदे गटात सामील झाल्यापासून शिवसेनेचे मतदार विभक्त झाले. शिवसेनेत फूट पडताच गुलाबराव पाटलांचे मित्र गुलाबराव वाघ देखील आमदारकीच्या तयारीला लागले. शिवसेनेच्या नेत्यांनी देखील त्यांना आमदारकीचे उमेदवार म्हणून जाहीर केले. शिवसेना विरुद्ध शिवसेना हे एक चित्र स्पष्ट होत असल्याने मते शिवसेनेची विभक्त होणार हे स्पष्ट झाले.

दोघांच्या वादाचा योग्य वेळी फायदा उचलण्याची हीच संधी असल्याचे मितभाषी आणि शांत स्वभावाच्या गुलाबराव देवकरांनी सहज ओळखले. अगोदरच्या भेटीगाठींचा वेग त्यांनी वाढवला. मतदारसंघातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे त्यांचे कार्य सुरूच आहे. आज शिवसेनेत दोन गट पडले असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अजूनही महाविकास आघाडीचाच भाग आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आल्या असून पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या धरणगावात त्यांनी सभा घेतली. सुषमा अंधारेंच्या सभेत व्यासपीठावर गुलाबराव देवकरांची उपस्थिती दिसून आली.

गुलाबराव देवकरांनी सभेला उपस्थिती देत एकाच बाणात दोन बाजू साधल्या. एक म्हणजे त्यांनी आघाडी धर्म निभावला तर दुसरे म्हणजे मतदारांच्या समोर जात आपले स्थान दाखवले. गुलाबराव पाटील आणि गुलाबराव वाघ या दोघांच्या स्पर्धत तिसरा गुलाब म्हणजेच गुलाबराव देवकर यांना आपल्या कार्याचा सुवास जळगाव ग्रामीणमध्ये पसरविण्याची हि सुवर्ण संधी असून सध्याच्या मार्गाने मार्गक्रमण केल्यास ती नक्कीच साध्य होऊ शकते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---