⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगींग प्रतिबंध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगींग प्रतिबंध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीतर्फे आयोजीत प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या संयुक्त बैठकीत रॅगींग प्रतिबंध या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या संयुक्त बैठकीला प्रथम आणि द्वितीय वर्षातील ३७६ विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील सभागृहात झालेल्या या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचे चेअरमन अधिष्टाता डॉ. प्रकाश सोळंके, वैदयकिय संचालक डॉ. एन.एस. आर्विकर हे होते. तर व्यासपीठावर कमिटीचे सदस्य तथा रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. माया आर्विकर, डॉ. बापुराव बिटे,डॉ विलास चव्हाण, डॉ. परितोष ठाकूर, पालक प्रतिनीधी कांचन रोटै,प्रा. शैलेश राणे, गर्ल्स होस्टेल रेक्टर अर्चना भिरूड व ज्योत्सना भिरूड, बॉइज होस्टेल रेक्टर सुरेंद्र गावंडे, माध्यम प्रतिनीधी, विद्यार्थी प्रतिनीधी पियुष कुकडे, सिध्दीका मुस्कान, हे उपस्थित होते. संयुक्त बैठकीचे प्रास्ताविक डॉ. बापूराव बिटे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना अ‍ॅन्टी रॅगींग विषयक माहिती पत्रकासह कमिटी सदस्यांची नावे आणि भ्रमणध्वनी क्रमांक असलेल्या पत्रकाचे वाटप करण्यात आले. तसेच कमिटीच्या सदस्यांचा परिचय देखिल करून देण्यात आला.

विद्यार्थ्यांनो रॅगींगविषयी सजग रहा
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीच्या संयुक्त बैठकीत कमिटीचे अध्यक्ष तथा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंखे आणि वैदयकिय संचालक डॉ. एन.एस. आर्विकर यांनी प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना रॅगींगचे कायदे, नियम आणि कारवाई याविषयी सखोल माहिती दिली. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मानसिक किंवा शारिरीक त्रास होईल असे कृत्य करू नये असा सल्ला दिला. तसेच कुठल्याही विद्यार्थ्याला रॅगींगसंबंधी त्रास होत असल्यास त्याने तातडीने अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीच्या सदस्याकडे तक्रार करावी असेही डॉ. आर्विकर यांनी सांगितले. कमिटीचे सदस्य रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, यांनीही विद्यार्थ्यांना रॅगींग प्रतिबंधाविषयी मार्गदर्शन करतांना रॅगींगला प्रतिबंध घालण्यासाठी स्क्‍वॉड स्थापन करण्यात आला असून याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच डॉ. बापूराव बिटे यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयातील नियमावलीसह रॅगींग केल्यानंतर होणार्‍या परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. संयुक्त बैठकीचे सुत्रसंचालन व आभार डॉ. बापूराव बिटे यांनी मानले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.