कानळदा येथे विद्यार्थ्यांना नॅचरोपॅथीवर मार्गदर्शन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । ‘रोग मुक्त भारत अभियाना’ निमित्त कानळदा येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांवर घरच्या घरी कसे उपचार करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. निशिगंधा नेमाडे व डॉ. सुहास नेमाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कानळदा येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दि.२७ नोव्हेंबर रोजी आयएनओ आणि आयुष्य मंत्रालयाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘रोग मुक्त भारत अभियाना’निमित्त निसर्गोपचारमधील प्रथमोपचार या विषयावर डॉ. निशिगंधा नेमाडे आणि डॉ. सुहास नेमाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यात निसर्गोपचार पद्धतीने विविध आजारांवर कशाप्रकारे मात करता येते, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, डोळेदुखी, खांदेदुखी, ताप यांसारख्या आजारांवर घरच्या घरी कसे उपचार करावे तसेच मडपॅक, स्टीमबाथ, हैड्रोथेरपी, एक्यूप्रेशर आदींबाबत माहिती देण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य कैलास चौहान यांच्यासह पाचशेवर विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.