जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अँटी रॅगिंग कमिटीतर्फे पदव्युत्तर विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंध’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अँटी रॅगिंग कमिटीचे चेअरमन अधिष्ठाता डॉ. प्रकाश सोळंके, वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर होते.
व्यासपीठावर कमिटीचे सदस्य तथा रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. विलास चव्हाण, गर्ल्स होस्टेल रेक्टर अर्चना भिरूड व ज्योत्स्ना भिरूड, बॉइज होस्टेल रेक्टर सुरेंद्र गावंडे, माध्यम प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी पीयूष कुकडे, उपस्थित होते. विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंध कायदे, कारवाई याविषयी माहिती देण्यात आली. सूत्रसंचालन प्रशासकिय अधिकारी प्रमोद भिरूड यांनी केले.