⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

मशीन लर्निंग अँड डाटा ऍनालिटिक्स युजिंग पायथॉन प्रोग्रामिंगवर उपक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शैक्षणिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२४ । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन आईईईच्या संयुक्त विद्यमाने जळगाव गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मशीन लर्निंग अँड डाटा ऍनालिटिक्स युजिंग पायथॉन प्रोग्रामिंग या विषयावर वन वीक फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम दि. ३ जून ते ८ जून या कालावधीत घेण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन आयएमआरचे संचालक डॉ. बी. व्ही. पवार तसेच त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. हेमंत इंगळे, रजीस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव कार्यक्रमाचे कन्व्हेनर प्रा. निलेश वाणी (संगणक विभाग प्रमुख), कार्यक्रमाचे कॉर्डिनेटर प्रा. प्रशांत शिंपी (संगणक विभाग), आयक्यूएसी कॉर्डिनेटर प्रा. तुषार कोळी तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग व इतर महाविद्यालयातील सहभागी प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. निलेश वाणी यांनी प्रास्ताविक करतांना कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व डॉ. हेमंत इंगळे यांनी सदर आयोजनाचे महत्त्व व विषयानुरूप माहिती दिली.

प्रमुख पाहुणे डॉ. बी. व्ही. पवार यांनी मशीन लर्निंग अँड नालिसिस संदर्भात माहिती देताना वेगवेगळ्या डाटा कलेक्शन, डाटा क्लिनिंग, डाटा अनालिसिस, विज्वलायझेशन, डाटा सिक्युरिटी, सब्जेक्ट ऑफ ए आय आणि मशीन लर्निंग अलगोरिदम्स या विषयांशी निगडित सविस्तरपणे माहिती दिली. पहिल्या दिवसाच्या दुसर्‍या सत्रामध्ये डॉ. हेमंत इंगळे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील एजंट्स संदर्भात दुसर्‍या दिवसाच्या पहिल्या सत्रात डॉ. विजय कोतकर यांनी जुपायटर नोटबुक पायथॉन प्रोग्रामिंग, सर्व सहभागी प्रतिनिधींकडून हँड्स ऑन प्रॅक्टिस करून घेतली. तिसर्‍या दिवशी प्रा. संदीप पाटील यांनी सकाळच्या सत्रात अन सुपरवाईज मशीन लर्निंग अलगोरीदम या संदर्भात माहिती देताना के एन एन क्लासिफायर, के मीन्स, फजी सी क्लस्टरिंग, कन्फ्युजन मॅट्रिक्स याबद्दल सांगितले व दुपारच्या सत्रात सहभागी प्राध्यापकांकडून प्रात्यक्षिक करून घेतले.

चौथ्या दिवशी प्रथम सत्रात प्रा. देवानंद बाठे यांनी ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग व मशीन लर्निंग याबद्दल माहिती दिली. प्रा. कविता बाठेयांनी बिल्डिंग सोल्युशन युजिंग मशीन लर्निंग, असेसमेंट, हायब्रीड प्रोच तसेच केस स्टडीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. पाचव्या दिवशी प्रा. प्रमोदगिरी गोसावी यांनी पायथॉन बद्दल मार्गदर्शन करताना डाटा स्ट्रक्चर, को लॅब, कॅगल, गेट हब प्रोजेक्टबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सहाव्या दिवशी प्रा. महेश एन पाटील यांनी सहभागी प्राध्यापकांसाठी योगासेशनचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी वेगवेगळ्या योगासनांच्या माध्यमातून प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना त्यांच्याकडून योगासने करून घेतले. कार्यक्रमाचे नियोजन संगणक विभाग प्रमुख प्रा.निलेश वाणी यांनी केले. प्रा. प्रशांत शिंपी यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील तसेच डॉ. हेमंत इंगळे अधिष्ठाता यांचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक विभागाचे सर्व प्राध्यापक वर्ग यांनी यशस्वी नियोजनासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. देवेंद्र फेगडे प्रा. शिरीन पिंजारी यांनी केले.