जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । आशिया खंडातील सर्वात मोठी सोसायटी मानली जाणारी ग.स.च्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही गटाला संपूर्ण बहुमत दिलेले नाही आहे. यामुळे ग.स.मध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. या मोर्चेबांधणीत सहकार गटाने लोकसहकार व प्रगती गटाला धक्का देत लोकसहकारचे दोन संचालक सहकार गटाच्या गळाला लागले असल्याची चर्चा रंगली आहे.
ग.स मध्ये बहुमतासाठी एकूण अकरा जागांची गरज आहे. मात्र पूर्ण बहुमत कोणाकडेच नाही. सहकार गटाकडे बहुमतासाठी २ जागा कमी पडत आहेत तर प्रगती व लोकसहकार गटाला ४ जागा कमी पडत आहेत. सहकार गटाकडे निवडून आलेले ९ तर २ फुटलेले असे ११ मते असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
तर दुसरीकडे लोकसहकार व प्रगती मिळून सहकार गटाला बाजूला ठेवणार असल्याचे देखील चर्चा सध्या रंगत आहेत सहकार गटाला कोणाचा पाठिंबा आहे माहिती नाही मात्र ग.स. सोसायटीमध्ये लोकसहकार व प्रगती गट मिळून सत्ता स्थापन करणार असं म्हटलं जात आहे. प्रगती गटाचे ६ लोकसहकार गटाचे ६ असे मिळून १२ जणांचे बहुमत देखील होऊ शकते असे म्हटले जात आहे.
त्यामुळे जर लोकसहकार गट आणि प्रगती गट एकत्र आला आणि सत्ता स्थापन केली तर सुनील सूर्यवंशी लोकसहकार गटाचे संचालक हेच अध्यक्षपदाचे उमेदवार असतील असे देखील म्हटले जात आहे.